दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’; अधिकारी थेट नागरिकांच्या दारी.

0
IMG-20260917-WA0324
Spread the love

 

वनपट्टे, घरकुल, कृषी योजना, कर्जमाफी, आरोग्यासह विविध प्रश्नांवर नागरिकांना अधिकृत मार्गदर्शन

गडचिरोली/भामरागड, दि. १७ : दुर्गम आणि नक्षलप्रभावित भाग म्हणून ओळख असलेल्या भामरागडमध्ये शासनाच्या योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात आला. वीर बाबुराव शेडमाके गणेश मंडळाच्या व्यासपीठावर विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक आमनेसामने आले.
वनपट्टे, कृषी योजना, घरकुल, शेतकरी कर्जमाफी, आरोग्य सुविधा, सिटी सर्व्हे, प्रॉपर्टी कार्ड, क्रीडांगण, वाचनालय, संजय गांधी निराधार योजना, माती परीक्षण तसेच नाली बांधकाम आदी विषयांवर नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली.
दुर्गम भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याऐवजी एकाच ठिकाणी अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी नागरिकांना अधिकृत माहिती देण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तहसीलदार किशोर बागडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी अतुल इंगळे, गटशिक्षणाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!