गुरुवडा येथे जमीन अधिग्रहणाविरोधातील बेमुदत साखळी उपोषण व समाज प्रबोधन कार्यक्रमाला महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांची भेट.
गुरुवडा, ता. जि. गडचिरोली

गुरुवडा, राखी, शिरपूर व हिरापूर येथील प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या, अडचणी व त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण होत असल्याने त्यांच्या शेती, उपजीविका आणि भविष्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या हक्कांचा विचार न करता कोणताही प्रकल्प राबविता कामा नये. शेतकऱ्यांची संमती, त्यांच्या हिताचे संरक्षण आणि योग्य मोबदला यांना प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी यावेळी मांडली.
तसेच, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असून, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्षात सदैव सोबत राहू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकररावजी सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,दिवाकर निसार, सरपंच गुरुवडा अनिल कोठारे, विकास जेंगठे, तात्याजी चिचघरे, गायक विजय शेंडे शेतकरी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते शेतकरी व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

