Spread the love

 

चामोर्शी: येथील सार्वजनिक रेस्ट हाऊस येथे NSUI-युवक काँग्रेस च्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात महावितरण कार्यालयावर २ जुलै काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाच्या पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करून त्यात निर्णय घेण्यात आला. स्मार्ट मीटर विरोधात ०२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता लक्ष्मी गेट, चामोर्शी येथून महावितरण कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या भव्य मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीस जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष निकेश गद्देवार, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, युवा काँग्रेस शहराध्यक्ष विलास चिचघरे, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष पिंपलदास सोयाम, NSUI उपाध्यक्ष तेजस कोंडेकर, सोशल मीडिया विजय लाड, हेमंत कोवासे, ओमप्रकाश चौधरी, प्रकाश कुडमथे, देवाजी कवठे, संजय बुरांडे, NSUI तालुकाध्यक्ष अमित किनेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.महावितरणच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार असून, विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत मोर्चा ऐतिहासिक करण्याचा संकल्प केला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *